E-Paper
Shopping Cart
Sign Up
or
Login
होम
देश
महाराष्ट्र
पुणे
मुंबई
नागपूर
नाशिक
सातारा
पिंपरी-चिंचवड
सांगली
सोलापूर
विदेश
क्रीडा
संपादकीय
व्यासपीठ
मनोरंजन
अर्थ
रविवार केसरी
शैक्षणिक
विज्ञान-तंत्रज्ञान
लाइफस्टाइल
गुन्हेगारी जगत
क्रीडा
राजस्तान रॉयल्सवर सामना निश्चितीचे धक्कादायक आरोप
Wrutuja pandharpure
23 Apr 2025
लखनौ
: आयपीएल २०२५ चा हंगाम सध्या सुरु आहे. आतापर्यंत ३९ सामने खेळवण्यात आले आहेत. मात्र याचदरम्यान राजस्थान रॉयल्सवर धक्कादायक आरोप करण्यात आला आहे. राजस्तान रॉयल्स आणि लखनौ सुपर जायट्स यांच्यात १९ एप्रिल रोजी खेळवण्यात आलेला सामना वादाच्या भोवर्यात सापडला आहे.
राजस्तान क्रिकेट असोसिएशन (आरसीए) च्या एड-हॉक समितीचे संयोजक जयदीप बिहानी यांनी राजस्थान रॉयल्सवर ’मॅच फिक्सिंग’चा आरोप केला आहे. १८१च्या लक्ष्याचा पाठलाग करताना राजस्तान संघ चांगल्या स्थितीत दिसत होता. पण, लखनौचा वेगवान गोलंदाज आवेश खानने शेवटच्या षटकांमध्ये सामना आपल्या संघाच्या बाजूने वळवला. या सामन्यात राजस्तानला २ धावांनी पराभव स्वीकारावा लागला होता. आता याच सामन्यावर प्रश्न उपस्थित करत जयदीप बिहानी यांनी ’मॅच फिक्सिंग’चा आरोप केला आहे. लखनौविरुद्धच्या सामन्यात शेवटच्या ओव्हरमध्ये फक्त नऊ धावा हव्या असताना तुम्ही सामना कसा गमावता? असा सवाल बिहानींनी विचारला आहे. ज्या पद्धतीने या सामन्याचा निर्णय लागला ते पाहता हा सामना फिक्स होता हे छोट्या मुलालाही समजेल, असं बिहानी म्हणाले.
जयदीप बिहानी मुख्य प्रशिक्षक म्हणून राहुल द्रविड आणि संजू सॅमसनच्या नेतृत्वाखालील संघावर गंभीर प्रश्न उपस्थित केले आहेत आणि पराभवावर शंका घेतली आहे. आयपीएलमधील राजस्तान रॉयल्सच्या कारभारावर सरकारने नियुक्त केलेल्या अॅड-हॉक समितीचे नियंत्रण का नाही, असा प्रश्नही त्यांनी विचारला आहे. दरम्यान, विशेष म्हणजे काही वर्षांपूर्वी मॅच फिक्सिंग प्रकरणामध्ये राजस्तान रॉयल्स आणि चेन्नई सुपर किंग्ज या दोन्ही संघांवर आयपीएलच्या शिस्त पालन समितीने २ वर्षांची बंदी घातली होती.
शेवटच्या षटकात राजस्तान रॉयल्सला विजयासाठी ९ धावांची आवश्यकता होती. लखनौ सुपर जायंट्सचा अवेश खान गोलंदाजी करत होता. राजस्तानचा फलंदाज ध्रुव जुरेल स्ट्राईकवर होता आणि शिमरॉन हेटमायर नॉन-स्ट्रायकर एंडवर होता. शेवटचं षटक टाकण्यासाठी आलेल्या आवेश खानने भेदक गोलंदाजी करत यॉर्करचा वापर केला. शेवटच्या षटकात आवेश खानने फक्त ६ धावा दिल्या आणि लखनौने सामना २ धावांनी जिंकला. जयदीप बिहानी गेल्या काही काळापासून राजस्तान रॉयल्सच्या क्रिकेट कारभाराविरुद्ध आवाज उठवत आहेत.
जयदीप बिहानी यांनी राजस्तान रॉयल्सच्या आयपीएल कारभारापासून राज्य संघटनेच्या एड-हॉक समितीला दूर ठेवण्याच्या क्रीडा परिषदेच्या निर्णयावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते. जयदीप बिहानी म्हणतात की, राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समितीला आयपीएलच्या बाबींपासून दूर ठेवणे योग्य नाही. जेव्हा समिती कोणत्याही अडचणीशिवाय सर्व स्पर्धा आयोजित करते, तेव्हा आयपीएलच्या बाबतीत ते का बाजूला ठेवले जाते?, असा सवाल जयदीप बिहानी यांनी उपस्थित केला.
राजस्तान रॉयल्सकडून सांगण्यात येते की, सवाई मानसिंग स्टेडियमशी सामंजस्य करार नाही. परंतु, कोणताही सामंजस्य करार नसला तरीही, आरआर प्रत्येक सामन्यासाठी जिल्हा परिषदेला पैसे देत आहे. अशा परिस्थितीत, सामंजस्य कराराचा मुद्दा का उपस्थित केला जात आहे? बिहानीच्या या आरोपांमुळे राजस्तान रॉयल्स आणि आयपीएलच्या व्यवस्थापनावर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. आता या आरोपांना राजस्थान रॉयल्स आणि बीसीसीआय काय उत्तर देतात हे पाहणे महत्वाचं ठरणार आहे.
Related
Articles
शहरात टँकरच्या संख्येत वाढ
10 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यासाठी समिती स्थापणार : विखे-पाटील
09 May 2025
शहरात टँकरच्या संख्येत वाढ
10 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यासाठी समिती स्थापणार : विखे-पाटील
09 May 2025
शहरात टँकरच्या संख्येत वाढ
10 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यासाठी समिती स्थापणार : विखे-पाटील
09 May 2025
शहरात टँकरच्या संख्येत वाढ
10 May 2025
पुण्यात जोरदार पाऊस
10 May 2025
माजी आयसीएआर प्रमुख अयप्पन यांचे निधन
12 May 2025
धर्मशालाऐवजी अहमदाबादमध्ये होणार पंजाब-मुंबई यांच्यातील सामना
09 May 2025
हुतात्मा जवानाचे पार्थिव पाहून कुटुंबीयांना दुःख अनावर
13 May 2025
जलसंपदा विभागाची महामंडळे स्वायत्त करण्यासाठी समिती स्थापणार : विखे-पाटील
09 May 2025
3,794
Fans
941
Followers
1,562
Followers
Most Viewed
1
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र आल्यास आनंदच : विखे-पाटील
2
राज्यात चार दिवस अवकाळी पाऊस
3
भारत-पाक तणाव निवळणार
4
जातींची नोंद काय साधणार?
5
कॅनडा-भारत संबंधात गोडवा येणार?
6
पाकिस्तानची खुमखुमी (अग्रलेख)